Komal
  • Home
  • Free Study Material
    • Class 1
    • Class 2
    • Class 4
    • Class 7
    • Class 8
    • Essay
  • Blog
  • About Us
  • Contact Us
Thursday, January 28, 2021
No Result
View All Result
Komal
  • Home
  • Free Study Material
    • Class 1
    • Class 2
    • Class 4
    • Class 7
    • Class 8
    • Essay
  • Blog
  • About Us
  • Contact Us
No Result
View All Result
Komal
No Result
View All Result
Home General Knowlege

Amazing Facts about Kedarnath Mandir | केदारनाथ मंदिर- न उलगडलेल कोडं

Amazing Facts about Kedarnath Mandir | केदारनाथ मंदिर - न उलगडलेल कोडं

by Komal
July 25, 2020
in General Knowlege
0
amazing facts about kedarnath mandir

amazing facts about kedarnath mandir

केदारनाथ मंदीराचे  निर्माण कोणी केल या बाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवान पासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण मला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर साधारण ८ व्या शतकात बांधल गेल असाव अस आजच विज्ञान सांगते. केदारनाथ मंदिर कमीत कमी १२०० वर्ष अस्तित्वात आहे. केदारनाथ आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा २१ व्या शतकात हि आहे. एका बाजूला २२,००० फुट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फुट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अश्या तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. ह्या क्षेत्रात मंदाकिनी नदी च राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अश्या प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती प्रचंड अभ्यास केला गेला असेल.Amazing Facts about Kedarnath Mandir | केदारनाथ मंदिर- न उलगडलेल कोडं

केदारनाथ मंदिर (Kedarnath Mandir) ज्या ठिकाणी आज उभ आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अश्या ठिकाणी त्याच निर्माण का केल गेल असाव? त्याशिवाय १००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कस उभ राहील असेल? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होत तर पृथ्वीवरच्या एका छोट्या आईस एज कालखंडाला हे मंदिर समोर गेल असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडल गेल असाव व त्याची शहनिषा करण्यासाठी वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडून ने केदारनाथ मंदिरांच्या (Kedarnath Mandir) दगडांवर लिग्नोम्याटीक डेटिंग हि टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे दगडांच आयुष्य ओळखण्यासाठी केल जाते. ह्या टेस्ट मध्ये अस स्पष्ट दिसून आल कि साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडल गेल होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.

२०१३ साल केदारनाथ इकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे सरासरी पेक्षा ३७५% जास्त पाउस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल ५७४८ लोकांचा जीव गेला. ४२०० गावाचं नुकसान झाल. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्ती लोकांना भारतीय वायू सेनेने एअर लिफ्ट केल. सगळाच्या सगळ वाहून गेल. पण ह्या प्रचंड अश्या प्रलयात केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला थोडा धक्का पण लागला नाही.

Amazing Facts about Kedarnath Mandir | केदारनाथ मंदिर- न उलगडलेल कोडं
अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया च्या मते ह्या प्रलयानंतर सुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चर च ऑडीट मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. आय.आय. टी. मद्रास ने मंदिरावर एन.डी.टी. टेस्टिंग करून बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झाल आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे. दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातल सगळ वाहून जाते. एकही वास्तु उभी रहात नाही. तिकडे हे मंदिर दिमाखात उभ आहे आणि नुसत उभ नाही तर अगदी मजबुत आहे. ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधल गेल आहे. ज्या जागेची निवड केली गेली आहे. ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभ राहू शकल आहे अस आजच विज्ञान सांगते आहे.

Amazing Facts about Kedarnath Mandir | केदारनाथ मंदिर- न उलगडलेल कोडं

हे मंदिर (Kedarnath Mandir) उभारताना उत्तर – दक्षिण अस बांधल गेल आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर हि पूर्व – पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधल गेल आहे. ह्यातील जाणकारांच्या मते जर मंदिर पूर्व- पश्चिम अस असत. तर आधीच नष्ट झाल असत. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच. पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. त्यामुळेच वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रोपर्टीज मध्ये फरक झालेला नाही. त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंट वर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड पाठीमागच्या घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार हि विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सगळ काही आपल्यासोबत वाहून नेल पण मंदिर आणि मंदिरात शरण घेतलेले लोक सुरक्षित राहिले. ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायू दलाने एअर लिफ्ट केल होत.

Amazing Facts about Kedarnath Mandir | केदारनाथ मंदिर- न उलगडलेल कोडं

श्रद्धेवर विश्वास ठेवावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाच मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. टायट्यानिक बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना एन.डी.टी. टेस्टिंग आणि तपमान कस सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजल. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याच ज्वलंत उदहरण नाही का? काही महिने पावसात, काही बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून उन, वारा, पाउस ह्यांना पुरून उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ मीटर वर ८५ फुट उंच, १८७ फुट लांबीच, ८० मीटर लांबीच मंदिर उभारताना त्याला तब्बल १२ फुटाची जाड भिंत आणि ६ फुटाच्या उंच प्ल्याटफोर्म ची मजबुती देताना किती प्रचंड विज्ञान वापरल असेल ह्याचा विचार केला तरी आपण स्तिमित होऊ. आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने १२ ज्योतिर्लिंग पेकी सगळ्यात उंचीवरच असा मान मिळवणार केदारनाथ च्या वैज्ञानिक बांधणीपुढे मी नतमस्तक.

Tags: amarnathbadrinathbadrinath templedelhi to kedarnathkedarnath floodkedarnath imageskedarnath mandirkedarnath moviekedarnath temple closing date 2019kedarnath temple historykedarnath temple imagekedarnath temple imageskedarnath temple insidekedarnath temple kedarnath uttarakhandkedarnath temple locationkedarnath temple openingkedarnath temple opening datekedarnath temple opening date 2020kedarnath temple photoskedarnath temple timingskedarnath weatherkedarnath yatratungnath templeuttarakhandwhere is kedarnath temple
Komal

Komal

Next Post
8th std hindi vaaris kon

8th Std Hindi | Varis Kon (वारिस कौन?) with explanation And QA

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

hemoglobin symptoms how to increase hemoglobin

Hemoglobin Symptoms and How to increase Hemoglobin

10 months ago
gudi padwa

गुढी पाडवा (Gudi Padwa)

11 months ago
January 2021
M T W T F S S
« Nov    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
Komal

© 2020 Komal Ahirrao DMCA.com Protection Status

Navigate Site

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • GDPR Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • Free Study Material
    • Class 1
    • Class 2
    • Class 4
    • Class 7
    • Class 8
    • Essay
  • Blog
  • About Us
  • Contact Us

© 2020 Komal Ahirrao DMCA.com Protection Status